महत्वाच्या बातम्या

 चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या


- दोन मुलीवरही केले कुऱ्हाडीने वार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगर हळदी (माल) येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना आज ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सदर घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, मृतक पत्नीचे नाव आशा मनोज लेनगुरे (३८) तर जखमी मुलींमध्ये अंजली मनोज लेनगुरे (१७), पुनम मनोज लेनगुरे (१२) असे आहे. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी यांच्यावर भादवी कलम ३०२, ३०७, ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती मनोज लेनगुरे (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos