महत्वाच्या बातम्या

 राज्यातील गारपीटग्रस्तांना ४०१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात मध्यंतरी गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याच्या महसूल विभागाने ४०१ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध जिह्यांच्या विभागीय आयुक्तांनी यासाठी मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले. मदतीची ही रक्कम खातेदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश सहकारी विभागाने जारी करावेत, असे महसूल विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos