महत्वाच्या बातम्या

 बनावट प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर वकिलाची स्वाक्षरी


- बीडमधून अटक : ११ जूनपर्यंत कोठडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / यवतमाळ : पोलीस भरतीप्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासणीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणाऱ्या पांडुरंग राम ढलपे (रा. बीड), या वकिलास बीडमधून अटक करण्यात आली. त्याला आज, सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, रविवार ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

यापूर्वी किशोर किसन तोरकड (रा. बोरीवन, ता. उमरखेड ), नवनाथ शहाजी कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली होती. यवतमाळ पोलीस दलात चालक पोलीस शिपाई ५८ व पोलीस शिपाई २४४ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात आली.

सदर पोलीस भरतीदरम्यान प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व इतर आरक्षणाचा फायदा घेऊन पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलीस दलास दिले होते. त्याअनुषंगाने यवतमाळ घटकातील प्रमाणपत्राचा लाभ घेणाऱ्या चार उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष बीड येथे जाऊन करण्यात आली. त्यात किशोर तोरकड याचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तरुणाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला २६ मे रोजी अटक करण्यात आली होती.

सदर प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिक्षक नवनाथ कदम याने तयार करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. दराटी व एलसीबीच्या पथकाला सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आले. त्यांनी शोध घेऊन नवनाथ कदम यासे व अटक केली होती. त्यानंतरही पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध सुरू ठेवला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणाऱ्या वकिलास अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली.





  Print






News - Rajy




Related Photos