महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद हायस्कूल विसापूर येथे पालक सभेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापुर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये ५ जून रोजी सोमवार ला सकाळी ८.०० वाजता पालकांच्या समस्या निवारणकरिता तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी माहिती करून घेण्याकारिता, प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेमध्ये पालकांनी जास्त संख्येने उपस्थिती दर्शवली होती. तसेच हायस्कूल मधील शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या पालकांसमोर उभे करून अभ्यासाबद्दल विचारणा करण्यात आले आणि माझा गाव माझी शाळा अभियान बद्दल सकारात्मक भिमिका दर्शवली. 

यावेळी विसापूर ग्रामपंचायत उपसरपंच अंकेश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, ग्रा. सदस्य सुरज टोमटे, ग्रा. सदस्य गजानन पाटणकर, ग्रा. सदस्य वैशालीताई पुणेकर, ग्रा. सदस्य रीना कामडे तसेच बल्लारपूर विधानसभा सचिव यु. काँग्रेसचे सचिव प्रितम पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल खनके शाळा समितीचे अध्यक्ष सुनील चौधरी व सुनील पुणेकर उपस्थित होते. तसेच सभेला संबोधित प्रदीप गेडाम यांनी केले व सुरज टोमटे यांनी हायस्कूल मधील वैशिष्ट्य सांगून सभेचे मनोबल वाढविले व येणाऱ्या काही दिवसामध्ये चंद्रपूर जिल्हा मधील असलेल्या सर्व जिल्हा परिषद हायस्कूलतील ही आमची जिल्हा परिषद हायस्कूल विसापूर सर्व गोष्टी मध्ये अव्वल क्रमांकवार येईल अशी सकारात्मक भूमिका वर चर्चा करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos