धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची
: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित उपप्रादेशिक कार्यालयाचा नियोजनशून्य कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून धनाच्या  चुकाऱ्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
विशेष म्हणजे उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत कोरची, मसेली,बेतकाठी,मर्केकसा, कोटरा,कोटगुल,बोरी, बेळगांव व कुरखेडा तालुक्यातील रामगड , पुराडा, खेडेगाव, मालेवाडा व येंगलखेडा असे एकूण १३ आधारभूत खरेदी केंद्र येतात.  यात एकूण ३९३२ शेतकरी आपल्या धानाला आधारभूत किंमत मिळावी अशी अपेक्षा घेऊन येतात. मात्र मागील अडीच महिन्यापासून केवळ बँकांचा फेरफटका शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
सदर कारभाराची बातमी १८  जानेवारी २०१९ ला आपल्या चॅनलने प्रसारित केली होती. परिणामी लगेचच तीन दिवसात थोडीफार धान्याची उचल करण्यात आली. मात्र आजची परिस्थिती जैसे थे आहे. 
सदर बाबीबद्दल काल १२ फेब्रुवारी ला  प्रादेशिक कार्यालय गडचिरोली चे उपव्यवस्थापक जयंत उमाये व विपणन विभाग प्रमुख आडे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याचे थातुरमातुर उत्तर दिले. ३ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचे चुकारे देण्याची हमी देणारी शासकीय यंत्रणा सद्यस्थितीत मात्र निष्क्रिय ठरत आहे,हे या उदाहरणावरून दिसून येत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos