जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला : ३० जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर : 
जम्मू- काश्मीरमध्ये पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. या हल्ल्यात ३० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात ३० जवान शहीद झाले असून, २० हून अधिक जवान जखमी आहेत.
सीआरपीएफचे डीजी आर. आर भाटनगर यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्याचा तपास सुरू आहे. हल्ला झाला त्यावेळी २५०० जवानांचा ताफा तिकडून जात होता. जखमींना उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे . 

   Print


News - World | Posted : 2019-02-14


Related Photos