महत्वाच्या बातम्या

 विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. धर्मराव बाबा आत्राम


- एटापल्ली तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : आदिवासीबहुल एटापल्ली तालुका हा अहेरी विधानसभेचा अविभाज्य घटक असून एटापल्ली तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतेच एटापल्ली तालुक्यातील शेवारी, ताटीगुंडम, गेदा, डुंम्मे आदी गांवात विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष प्रसाद राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे एटापल्ली तालुका उपाध्यक्ष पवन निलिवार, विजय अतकमवार, येमली चे सरपंच ललिता मडावी,गेदा चे उपसरपंच दुसरी मट्टामी, ग्रा.प.सदस्य मिरवा पदा, अजय पदा, मेसो पदा, संदीप वैरागडे, अरविंद वेलांटी, अरूणा तलांडी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून एटापल्ली तालुक्याची ओळख आहे. येथील खेड्यापाड्यांचा विकास करायचा असेल तर मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पूलाचे बांधकाम करून त्या गावांना तालुका मुख्यालयाशी जोडल्याशिवाय पर्याय नाही. आजही अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. त्या गावांत मूलभूत सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असून विकासकामांना गती कशी मिळेल, यासाठी वरिष्ठ पातळीवर आपले प्रयत्न सुरू आहे. माझ्या निर्वाचन क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी मांडून हळूहळू त्या विविध समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहे. एवढेच नव्हेतर आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर दिले जात असल्याचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.


या कामांचे केले भूमिपूजन : 

येमली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ताटीगुंडम येथे पांडू डोलू दुर्वा ते जनार्दन तुलसीराम मांडवगडे यांच्या घरापर्यंत सी सी रोड नाली बांधकाम, मंगी माधव आलम ते बुद्धा लालू वेलादी यांच्या घरापर्यंत सीसी रोड नाली बांधकाम करण्यात आले. मौजा घोटसूर येथे गणेश शेंडे ते बालाजी मडावी यांच्या घरापर्यंत सी सी रोड बांधकाम करण्यात आले. याचे लोकार्पण आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. 

शेवारी गावात जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि गोटूल बांधकामाचे भूमिपूजन आ. धर्मराव बाबा आश्रम यांच्या हस्ते करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos