सातत्याने तोट्यात असलेली बीएसएनएल बंद करण्याचा सरकारचा विचार?


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  सातत्याने तोट्यात असलेली  भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएला   केंद्र सरकारने    नवसंजीवनी देण्याबाबत तसंच कंपनी बंद करण्याबाबत अशा दोन्ही पर्यायावर तुलनात्मक विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
२०१७ - १८ या आर्थिक वर्षात बीएसएनएलचा एकूण तोटा ३१,२८७ कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर बीएसएनएलच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून अशाप्रकारचे निर्देश देण्यात आल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांद्वारे दिली आहे.
या बैठकीदरम्यान बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दूरसंचार सचिवांसमोर एक प्रेझेंटेशन दिलं. यामध्ये त्यांनी रिलायंस जिओच्या प्रवेशामुळे झालेले परिणाम , कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती यासह कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्ती संदर्भातील आकडेवारीची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सरकारकडून बीएसएनएलला सरकारकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांवर विचार करण्यास सांगण्यात आलं. यामध्ये कंपनीला नवसंजीवनी देण्यापासून ते कंपनी बंद करण्यापर्यंतच्या सर्व पर्यायांचा समावेश आहे. ‘प्रतिस्पर्ध्यांशिवाय कंपनीसमोरचं मोठं आव्हान म्हणजे कंपनीत मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे’, असं बीएसएनएलकडून बैठकीत सांगण्यात आलं. ही संख्या कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचं वय ६० वर्षांवरुन ५८ वर्षे करण्यात यावं, २०१९ - २० पासून स्वेच्छानिवृत्तीचं वय कमी कमी केल्यास, कंपनीचे ३ हजार कोटी रुपये वाचतील असंही बीएसएनएलच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितलं. 

   Print


News - World | Posted : 2019-02-14


Related Photos