मूल येथे वेडसर मुलाने केली आईची दगडाने ठेचून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मूल :
भीक मागून जेवण न दिल्याच्या कारणावरून वेडसर मुलाने  वृद्ध व निराधार असलेल्या  आईची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मूल येथील वार्ड क्रमांक १४ मध्ये घडली. कमला बाबुराव दुर्योधन (६२), असे  मृत वृद्ध मातेचे नाव  आहे.  तर  धीरज बाबुराव दुर्योधन (४०) असे आरोपीचे  नाव आहे.
मूल येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या मागील बाजूला एका छोटय़ाशा झोपडीत कमला दुर्योधन व तिचा मुलगा धीरज वास्तव्याला होते. कमला भीक मागून स्वत:चा व वेडसर मुलाचा सांभाळ करीत होती. रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान धीरज दुर्योधन याने वृद्ध आईला जेवण मागितले.  परंतु कमलाने जेवण दिले नाही. यावरून तू भीक मागून मला जेवण का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून वेडसर मुलगा धीरजने वृद्ध  मातेला दगडाने ठेचून ठार केले. या घटनेची माहिती वार्डातील नागरिकांनी मूल पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीच्या आधारे मूल पोलिसांनी धीरज दुर्योधन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-13


Related Photos