महत्वाच्या बातम्या

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्य सामाजिक वनीकरणमार्फत विविध कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या (०५ जुन) औचित्याने  सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुन ते ५ जुन २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात नागरिका़नी सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने  केले आहे.

कार्यक्रमांतर्गत १ जुन रोजी मूल परिक्षेत्रातील महात्मा ज्योतीबाराव फुले, विद्यालय चिरोली, येथील शालेय विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्याचा वापर करणे, रेन वाटर हार्वेस्टींग स्ट्रक्चर बांधणे, परिसर प्लॅस्टिक पिशवी मुक्त करणेबाबत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच नागभिड परी क्षेत्रांतर्गत धर्मराव कन्या विद्यालय, नवेगांव पांडव गावांमधून प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. राजुरा परिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पर्यावरण, मानवता विकास संस्था, शाखा राजुरा व सामाजिक वनीकरण, परिक्षेत्र राजुरा यांचे संयुक्त विद्यमानाने सहकार कार्यालय येथे प्लॅस्टिक मुक्त घोषीत करणारी जनजागृती मोहिम राबविणे व आदर्श हॉयस्कुल राजुरा या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक मुक्त मोहिम राबविण्यात आली. २ जुन रोजी वरोरा सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत चेतना विद्यालय, माजरा येथील शालेय विद्यार्थीकडून बि-बियाने गोळा करुन सिडबँक तयार करणे, प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापरणे बाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच ०३ जुन रोजी चिमुर परिक्षेत्रामधील नेहरु विद्यालय शंकरपूर या शाळेतील विद्यार्थ्यांकडून वापरलेल्या वहिचे शिल्लक पानांपासून नवीन वह्या तयार करुन त्या गरजु विद्यार्थ्यांना वाटप करणे, ग्रामदर्शन विद्यालय, चिमुर येथील शालेय विद्यार्थ्यांकडून गावातील वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावून पर्यावरणबाबत जनजागृती करणेबाबत नियोजन केलेले आहे. तसेच सिंदेवाही परिक्षेत्रामधील भारत विद्यालय नवरगांव येथील विद्यार्थ्यांमार्फत पर्यावरण दिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे. ४ जुन रोजी भारत विद्यालय, पळसगांव जाट येथील विद्यार्थ्यांमार्फत वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे. मातोश्री विद्यालय, नवरगांव येथील विद्यार्थ्यांकडून पर्यावरण व स्वच्छता याबाबत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. ०५ जुन २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्य चंद्रपूर विभागीय कार्यालय तसेच परिक्षेत्र स्तरावर विविध सामाजिक संस्था, शालेय शिक्षण संस्था यांचे सहाय्याने सिडबँक तयार करणे, कापडी पिशव्याचे वाटप करणे, चंद्रपूर परिक्षेत्रामधील अशासकीय संस्था आणि शालेय विद्यार्थी यांचे मदतीने रामाळा तलाव प्लॅस्टीक निर्मूलन व स्वच्छता कामे करणे, ईकोप्रो अशासकीय संस्था यांचे मदतीने परकोट किल्ला स्वच्छता अभियान राबविणे, वरोरा परिक्षेत्रामधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय टेंभुर्डा वृक्षारोपवन करुन वृक्ष संवर्धन करणे, प्लॅस्टिक मुक्त परिसर करणेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्य होणाऱ्या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos