महत्वाच्या बातम्या

  रेती तस्करी करणाऱ्या हायवा ट्रक वर कडक कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आज ०३ जुन २०२३ रोजी सकाळी ४:१५ वा दरम्याम सपोनि राजकीरण मडावी, नेमणूक पोलीस स्टेशन पडोली हे पो स्टाफ चपोना/शहाजी खांडरे, पोलीस शिपाई/किशोर वाकाटे यांचेसह पोलीस स्टेशन पडोली हद्दीमध्ये गुडमॉर्निंग पेट्रोलिंग करीत असताना यातील आरोपी ट्रकचालक १) अविनाश नारायण ठाकूरीया (३८), जात-कोल, रा. अष्ठभुजा, रमाबाई नगर, चंद्रपूर २) सरफराज खान भुरेखान पठाण (४२), जान-मुस्लीम, रा. बाबुपठ, नेताजी चौक, चंद्रपूर असे पडोली ते घुग्गुस रोडने ट्रक क्र. MH३४ BG५८६३ व ट्रक क्र. MH३४ BG५८६४ 

यामध्ये रेतीची वाहतूक करीत असताना दिसल्याने नमूद ट्रकमध्ये अवैधरित ९ रेतीची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने सपोनि मडावी यांज पोलीस स्टाफसह दोन्ही ट्रकचा पाठलाग करून ट्रक थांबविला व ट्रक चालकास विचारपूस केली असता ते दोन्ही ट्रक चालकांनी आरोपी क्र. ३) अश्वीन उर्फ गुड्डू ठाकूर (३७), रा. सरकार नगर, चंद्रपूर याचे सांगणेवरून विना परवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. यावरून नमूद आरोपी हे गौनखनिज रेतीची चोरी करून वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने १) रेतीने भरलेला ट्रक क्र. MH३४ BG५८६३ किंमत रु. १५ लाख त्यामध्ये रेती रु. २० हजार २) रेतीने भरलेला ट्रक क्र. MH३४ BG५८६४ किंमत रु. १५ लाख त्यामध्ये रेती रु. २० हजार असा एकूण रु. ३० लाख ४० हजार चा मुद्देमाल जप्त करून ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपीविरुद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी क्र १ व २ यांना अटक करण्यात आली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos