महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर पोलीस सदैव तत्पर, आपल्यासोबत आपल्यासाठी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : डायल ११२ प्रकल्प, चंद्रपूर जिल्यात प्रभावीपणे कार्यरत असुन सदर प्रकल्पाकरीता अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर प्रकल्पात पिडीत व्यक्ती प्राथमिक संपर्क केंद्र, मुंबई (PCC) व द्वितीय संपर्क केंद्र, नागपूर (SCC) येथे आपल्या समस्येबाबत माहिती देतो. संपर्क केंद्रामधील कॉलटेकर हे पिडीत व्यक्तीकडुन माहिती घेवुन डायल ११२ प्रकल्प, जिल्हा नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथे सदर कॉलची माहिती पाठवितो. डायल ११२ प्रकल्प, नियंत्रण कक्षाकडुन पिडीत व्यक्तीच्या अगदी जवळ असलेल्या वाहनांवर सदर कॉलरची माहिती देवुन मदत पुरविण्यात येते.

२४ मे २०२३ रोजी सायंकाळी अंदाजे ०६ ते ०७ वाजताचे दरम्यान योगेश पुट्टावार रा.नांदा वार्ड क्र. १ ता. कोरपना जि. चंद्रपूर हे बस प्रवासा दरम्यान बॅग चोरी झालेबाबत सदर CFS कॉल मुंबई येथून डायल ११२ प्रकल्प, चंद्रपूर येथे प्राप्त झाला. त्या अनुषंगाने तक्रारदार गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याचे निर्दशनास आले. त्यामध्ये रोख रक्कम २ हजार रूपये व कॉलरचे तसेच कॉलरच्या मित्राचे स्पोर्ट्स सर्टीफिकेट होते, अशी माहिती प्राप्त झाली. 

सदर बॅग शोध कामी तात्काळ गडचांदूर येथील डायल ११२ प्रतिसादक पोलीस अंमलदार पोहवा धर्मेंद्र रामटेके ब.नं. १९०३ व पोलीस अंमलदार राहुल बनकर ब.नं. २८२९ यांना माहिती देवुन बस स्टॉप चौक गडचांदूर येथे शोधकामी पाठविण्यात आले. बस क MH१४ HB ८८२३ या बसमध्ये तपासणी केली, त्या बसमध्ये तक्रारदार यांची बॅग मिळुन आली. पोलीस अंमलदार यांनी अतिशय तत्परतेने बॅगचा शोध घेवुन तकारदार योगेश पुट्टावार यांना बोलावून त्यांची बॅग सुपूर्त केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos