महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर लोकसभा ची पोट निवडणूक होणार का ?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी लवकरच पोटनिवडणुक जाहीर केल्या जाईल काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच ३० मे रोजी अल्पशा आजाराने दिल्लीत बाळु धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंद्रपूर लोकसभेची जागा आता रिक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

यामध्ये शपथपत्र फॉर्म २६, नामनिर्देशित पत्र फॉर्म २A ,फॉर्म A आणि फॉर्म B, निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र फॉर्म २२, बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील याबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. 

पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक होणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos