५ हजाराची लाच स्वीकारतांना आरमोरीचा तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात


- गडचिरोली एसीबी पथकाची कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
विटा भट्टीच्या परवान्यावर सही करून मंजूर करून देण्याच्या कामासाठी ५ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरमोरी तहसील कार्यालयातील तहसीलदास रंगेहात अटक केली आहे . यशवंत तुकाराम धाईत (५५) तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी (वर्ग-१) आरमोरी असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे . 
तक्रारदार हा विटा भट्टीचा व्यवसाय करीत असून विटा भट्टीचा परवान्यावर सही करून मंजूर करून देण्याच्या कामासाठी  ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. सापळा कारवाईदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी लाच रक्कमेची पंचासमक्ष सुस्पष्ट मागणी करून लाच रक्कम स्वीकारली.  याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई  ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र नागपूर चे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्लवार,  पोलीस उपअधिक्षक शंकर शेळके,   पोलीस उपअधिक्षक ज्ञानदेव घुगे  चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात  पोनि रवि राजुलवार, सपोउनि मोरेश्वर लाकडे, पो हवा प्रमोद ढोरे,  नापोशी सतीश कत्तीवार, देवेंद्र लोणबळे,  पोशी महेश कुकुडकार, चापोशी स्वप्नील वडेट्टीवार यांनी केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos