राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर १५ ला गडचिरोली दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे दिनांक  १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  
 आयोगाचे उपाध्यक्ष अभ्यंकर यांचे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण.  सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे शासकीय विश्रामगृहात आगमन.  सकाळी ११ ते १२ वाजता पर्यंत अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी. दुपारी १२ ते १ वाजतापर्यंत अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांचेसोबत बैठकीत उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ वाजतापर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी ( प्राथ/ माध्य/ निरंतर), प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांची आढावा बैठक घेतील. दुपारी २. ३०  वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos