महत्वाच्या बातम्या

 न.प. गांधी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद द्वारे संचालित गांधी विद्यालय येथील निकाल ७४.६६% लागला. शाळेचा विद्यार्थी गौरव बादल आकरे ८९.४०% गुण घेऊन शाळेतून प्रथम आला तसेच द्वितीय हृतिक अशोक वांढरे ८२% , तृतीय भाग्यश्री बंडू दरणे हिला ७४.६०% मिळाले. शाळेतून एकूण ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

यामध्ये दोन विद्यार्थी प्रविण्य श्रेणित, प्रथम श्रेणित १९, द्वितीय श्रेणित २७, तृतीय श्रेणित ०८ विदयार्थी पास झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कडुकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos