भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
स्थानिक राजे विश्वेश्वराव कला वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व ग्रामीण रुग्णालय भामरागड यांच्या सयुंक्त विद्यमाने महाविद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
राष्ट्रीय किशोर स्वास्थ तथा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तंबाखूचे दुष्परिणाम व लैगिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची मुखतपासणी करण्यात आली . यावेळी राज्यशात्र विभाग प्रमुख डॉ. संतोष डाखरे , डॉ. कैलास निसाडे, नेते मॅडम, सेडमेक मॅडम उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos