१५ पासून भंडाऱ्यात महाएकांकिका महोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  भंडारा :
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील नामांकित एकांकिका महोत्सवातील पारितोषिक प्राप्त एकांकिका महोत्सव व नाटय प्रशिक्षण कार्यशाळा १५ व १६ फेब्रुवारी २०१९ रोजी संतकृपा सभागृह प्रगती कॉलनी, स्टेशन रोड, भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या आहे.
१५ व १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ६ एकांकिका दाखविण्यात येणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी धनवटे महाविद्यालय नागपूर येथील विरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित गटार या एकांकिकेने महोत्सावाची सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजता लेखक दिग्दर्शक निलेश प्रभाकर, रंगोदय रुपांतर मुंबईची रवंथ ही तर रात्री ९ वाजता लेखक दिग्दर्शक वैभव देशमुख स्यमंतक अमरावतीची रुबरु ही एकांकिका सादर केली जाणार आहे. शनिवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळात तीन एकांकिका सादर केल्या जातील. यात लेखक दिग्दर्शक अमोल साळवे, प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगरची पि.सी.ओ, लेखक रोहित कोतेकर महर्षी दयानंद महाविद्यालय मुंबईची तूरटी व लेखक नचिकेत, स्वामी नाटयांगण डोंबीवलीची बी फोर द लाईन या एकांकिकेचा समावेश आहे. या एकांकिका पाहण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांनी केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-12


Related Photos