महत्वाच्या बातम्या

 न्यायाधीशांवर हात उगारणे पोलीस निरीक्षकाला पडले महागात : १४ दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : न्यायालयाने विरोधात निकाल दिल्याने संतप्त पी. आय. ने न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन शिवीगाळ, मारहाण करीत धमकी दिल्याप्रकरणी न्यायाधीशाचे वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची चामोर्शी पोलीसांनी चौकशी करुन चामोर्शी चे तत्कालीन पी आय राजेश खांडवे यांचेवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आणि शनिवारी त्यांना चामोर्शी कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी खांडवे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते.


घडलेल्या घटनाक्रमानुसार पोलीस निरीक्षक राजेश खांडवे हे गुरुवार २१ मे रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास न्यायाधीशाच्या बंगल्यावर गेले आणि आत घुसून न्याधीशांना अश्लील शिवीगाळ, त्यांचे गालावर चापट मारून धमकी दिली. या घटनेची व्हिडिओग्राफी न्याधीशांच्या बंगल्यावर असलेल्या शिपायाने केली. त्या आधारावर न्याधीशांच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ती पूढे चामोर्शी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.


उल्लेखनीय आहे की, एप्रिल महिन्यात पार पडलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी २० मे रोजी दिले होते. त्यामुळे संतप्त पी आय खांडवे यांची न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन त्याचेवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली होती.


एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होती. त्यासाठीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्याच दिवशीच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व जोड्याने मारहाण केल्याचा आरोप निवडणुकीतील एक उमेदवार आणि सभापती अतुल गण्यारपवार यांनी केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या sa हाताला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय तशी तक्रारही गण्यारपवार यांनी केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजे खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२३, ४२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले होते.
गण्यारपवार प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार असून यामध्ये जर न्यायालयाने खांडवे यांचे विरोधात आदेश पारित केला तर त्यांना दुहेरी खटल्याचा आरोपी संबोधले जाईल. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos