कोंढाळा जवळ पीक अप वाहनाची दुचाकीस धडक, इसम जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
पीक अप वाहनाचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने अनियंत्रित वाहनाची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. मृतक दुचाकीस्वाराची अद्याप ओळख पटलेली नाही.  ही घटना आज दुपारी ०३ ते ३.३० च्या दरम्यान कोंढाळा वरून काही अंतरावर घडली.
पिकप वाहन क्र. एम एच ३६ एफ २७९४ हे वाहन  मच्छी घेऊन आरमोरीकडे जात असतांना अचानकपणे मागील डाव्या बाजूचा टायगर फुटल्याने व आरमोरी कडून जात असलेल्या  एम एच ३३ के ९८९३ दुचाकीस धडक दिली.  यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला आहे. दुचाकीस्वाराची अजूनही ओळख पटलेली नाही. दुचाकी स्वाराचे अंदाजे वय ३० वर्षे आहे.  सदर घटनेची माहिती कोंढाळा येथील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना दिली असता,त्यांनी घटनास्थळी भेट देऊन देसाईगंज पोलीस ठाण्यास माहिती देऊन पाचारण केले.  काही वेळातच देसाईगंज पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी व ओळख पटविण्याकरिता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे हलविण्यात आले. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos