महत्वाच्या बातम्या

 गर्कापेठा येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला ऋतुराज हलगेकर यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील गर्कापेठा येथील हनुमान मंदिरात 3 जून रोजी हनुमान स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी आपली उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.


गर्कापेठा येथील भव्य हनुमान मंदिरात 3 जून रोजी श्री हनुमान स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी उपस्थित उपस्थित राहून विधिवत पूजा करून श्री हनुमान स्वामीचे आशीर्वाद घेतले. एवढेच नव्हे तर या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात हिरीहिरीने भाग घेऊन सहकार्य केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, पोलीस निरीक्षक म्हस्के, सुरेश गावडे, शंकर कोंडागुर्ला, पोचना दुर्गम, किरण दुर्गम, कोला आत्राम, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos