थकीत विज देयकाची किस्त पाडून विजपुरवठा सुरळीत करण्याकरीता लाच मागणारी महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
थकीत असलेले १  लाख २० हजारांच्या विज देयकाचे हप्ते पाडून विजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना एसएनडीएल छाप्रुनगर नागपूर येथील कार्यालयात कार्यरत महिला वसुली अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे.
सुरया खान शकील खान (३०)  असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वसुली अधिकारी महिलेचे नाव आहे.  
तक्रारदार  टिमकी दादरापुल, भानखेडा जवळ नागपुर येथे परिवारासह रहातो.  त्याच्या घरी दोन विद्युत मिटर आहेत. त्यातील एक मिटर हे तक्रारदाराच्या नावाने आहे तर दुसरे मिटर हे त्यांच्या वडीलांचे नावाने आहे. दोन्ही विद्युत मिटरचे अंदाजे १ लाख २० हजार रूपयांचे विद्युत बिल स्थगीत असल्याने अंदाजे मागील एक वर्षा पासुन दोन्ही मिटरचा विद्युत पुरवठा एस.एन.डी.एल. कार्यालय नागपूर ने खंडीत केला होता. त्यानंतर अंदाजे आठ  दिवसापुर्वी एस.एन.डी.एल. नागपूर येथील महीला कर्मचारी तक्रारदाराच्या घरी आली व तक्रारदाराला   बिलाचा भरणा करण्याबाबत विचारणा केली. यावेळी तक्रारदाराने त्यांना त्यांचा परीचय  विचारला त्यांनी तक्रारदाराला सांगीतले की आम्ही एस.एन.डी.एल.झोन छाप्रूनगर,नागपूर येथील रकव्हरी ऑफिसर असून आपले स्वताचे नाव सुरया खान शकील खान  असे सांगितले. तसेच  स्वताचे ओळखपत्र दाखविले . मोमीनपुरा विभाग आमच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे तिने सांगितले.  तक्रारदाराने बिलात व्याजाची रक्कम जास्त आहे तसेच  एवढी मोठी रक्कम भरणे   शक्य नाही असे सांगितले.  यावेळी  सुरया खान शकील खान यांनी तक्रारदाराला  बिलाची  थकबाकी आहे त्याची किस्त करून देण्यासाठी व लाईन सुरू करून देण्याकरिता  ५ हजार रूपये लाचेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक   विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सदर सापळा  कार्यवाही दरम्यान सुरया खान शकील खान  यांनी तक्रारदारास  ५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द नागपूर तहलसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे,  अपर पोलीस अधिक्षक  राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक  राजेश  पुरी,  पो.हवा. अशोक बैस, ना.पो.शि. प्रभाकर बले, महिला नापोशि शालीनी जांभुळकर, जया लोखंडे, गीता चौधरी व चालक नापोशि शिशुपाल वानखेडे  यांनी केली आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-02-12


Related Photos