नवनियुक्त जिल्हाधिकारी व्ही.एल. भीमनवार यांनी स्विकारला पदभार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची वर्धा येथून नुकतीच अमरावती येथे बदली झाली असल्याने त्यांच्या जागेवर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एल. भीमनवार यांनी सकाळी वर्धा जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारली.
 भीमनवार हे भारतीय प्रशासन सेवेतील २००९ च्या तुकडीचे अधिकारी आहे. यापूर्वी ते ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी ठाणे येथे विविध विकासकामांना गती दिली होती. विवेक भीमनवार (IAS) यांचे शिक्षण एमएससी Statistics, LLB,A.C.A आहेत. भारतीय प्रशासन सेवेच्या २००९ च्या तुकडीचे अधिकारी असलेले विवेक भीमनवार हे मुळता विक्रीकर विभागातील असून विक्रीकर सहआयुक्त म्हणुन धुरा सांभाळली आहे. त्यांनी या खात्यात विविध पदावर काम केलेले आहे. कर प्रणालीचा त्यांचा गाढा अभ्यास असून ते या विषयातील तज्ञ मानले जातात. कर विभागाचे संगणकिकरण आणि व्हॅटची अंमलबजावणी यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. १ जुलै २०१८ पासुन लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर (GST)मध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तसेच विविध देशामध्ये झालेल्या परिषदा मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे.
 
प्रशासकिय कामाची वाटचाल

१.विक्रीकर विभागातील विविघ पदांवर काम केले.
२.मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयात सचिव म्हणुन कामकाज केले आहे.
३. ९ मार्च ते २०१७ पर्यंत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
४.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त,
५.मा.राज्यपाल यांच्या हस्ते डिजिटल शाळा अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
६. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त
७. गेल्या चार वर्षापासुन स्वच्छ भारत मिशन उपक्रम सातत्याने राबविल्या जात असल्याने ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात किटकजन्य आणि जलजन्य आजारावर मात करण्यास यश
९. ग्रामीण भागात महिलांची प्रसुती घरीच होत असे त्यामुळे मातेला नि बाळाला धोका निर्माण हेण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन गावात दाईच्या माध्यमातून सुरक्षित प्रसुती करण्यासाठी विशेष योजना हाती घेण्यात आली. त्यामुळे १०० टक्के प्रसुती या दाई करत आहेत. त्यांना प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येतो.
१० . जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत १५४ कामे पुर्ण करुन त्यापासुन १२६ हेक्टर सिंचनास लाभ झाला तसेच १३ गाव टँकरमुक्त करण्यास यश आले. असून १० हजार लोकांना त्याचा फायदा झाला. ग्रामीण भागाची पाणी टंचाई दूरकरण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना आणि नविन विहिरींची तब्बल १३३ कामे मंजुर. ४ विशेष खर्डी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन खर्डी गावातील महिलांची लोकलने पाण्यासाठी करावी लागणारा जीवघेणी प्रवास थांबला.
११ . शेतीची काम करणा-या मजुरांची समस्या लक्षात घेऊन आधुनिक शेतीची औजारे महिला बचत गटांना अनुदान तत्वावर देणारी औजारे बँक ही योजना राबवली. त्यामुळे महिला बचतगट सक्षम झाले.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-12


Related Photos