कंटेनरची ऑटोरिक्षाला धडक : आठ जण गंभीर


- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अकोला मार्गावरील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती : 
रस्ता कामावरील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गावरील येनी पांढरीजवळ घडली. जखमींवर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
विद्या उमेश पवार (३५) रा. अंजनगाव , मोनाली राजेंद्र सोळंके (२७) रा. अंजनगाव , रमेश रामराव थोटे (४५) रा. निंभा ता. बाळापूर , भरत गणपतराव रावळकर (६०)  रा. गावंडगाव , मोहम्मद इजाज मोहम्मद बहोद्दीन (२५) रा. अंजनगाव , बानूबी (६०) रा. शिरजगाव , नजमाबी शाह (६५), शिरजगाव , माधवी अरविंद सावरकर (२०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
एमएस २७ एआर ०२३६ क्रमांकाच्या ऑटोरिक्षा प्रवासी अंजनगावकडे नेत असताना पांढरीनजीक फाट्यावर एमएच २७ बीएक्स १९९७ क्रमांकाच्या टँकरने जोरदार धडक दिली. त्यात ऑटोतील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, पाठीला, कमरेला, पायाला गंभीर इजा झाली. या सर्व जखमींना सावळी येथील प्यारेलाल प्रजापती व रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविले. त्या सर्वांना पुढील उपचारार्थ अमरावतीला हलविण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-12


Related Photos