ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या : राष्ट्रीय ओबीसी महासंघ देसाईगंज शाखेची मागणी


- मागण्या मान्य न केल्यास निवडणुकांवर बहिष्कार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
एस. सी, आणि एस. टी. समाजाप्रमाणे ओबीसी समाजाची सुद्धा जातीनिहाय आकडेवारी घोषित करा व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघ देसाईगंज शाखेतर्फे उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांच्या मार्फतीने राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले आहे . 
निवेदनात म्हंटले आहे की,  भारताच्या  स्वातंत्र्यानंतरही ओबीसी समाजाची जातीनिहाय  आकडेवारी घोषित करण्यात आलेली नाही.  मंडल आयोगाच्या १३ व्या शिफारशींनुसार ओबीसीना २७  टक्के  १९९२  ला  आरक्षण देण्यात आले होते. बहुसंख्य समाजाची जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी नसल्याने ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक, परिस्थिती कमकुवत आहे. बेरोजगारांचे संकट ओढावले आहे. देशामध्ये ढोरांची , गुरांची गणना केली जाते. परंतु ओबीसीची नाही.                                                            
 जिल्ह्यामध्ये ५० टक्केच्या वर ओबीसी समाज असूनही आरक्षण कमी करण्यात  आले. १९  टक्यावरून  ६ टक्के आरक्षण देण्यात आले. ते १९ टक्के आरक्षण पूर्वरत करावे . तसेच जिल्हात  बहुतांश गावात गैरआदिवासी   असताना सुद्धा पेसा कायदा लावण्यात आलेला आहे .यामुळे आपण पुनरसमिती गटन करावी व  गैरआदिवासी  गावे हि पेशामुक्त करण्यात यावी. 
ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी.  इतरांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा स्वाधार योजना लागू करण्यात यावी. व ओबीसी कर्मचाऱ्यांना  पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे .  असंवैधानिक  नान - क्रिमीलेअर अट रद्ध करण्यात यावी या मागण्या करिता धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तेव्हा सदर मागण्या संदर्भात दखल घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्या,  मागणी पूर्ण न झाल्यास ओबीसी समाजातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघ देसाईगंज शाखेने निवेदनातून केला आहे . 
यावेळी लोकमान्य बरडे, सागर वाढाई, रमाकांत ठेंगरे जि. प. सदस्य,  नितीन राऊत माजी उप सभापती,  सुनील पारधी ग्रा. प. सदस्य, कमलेश बारस्कर उप सरपंच चोप, कैलास पारधी सरपंच मोहटोला, प्राध्यापक दामोधर सिंगाडे,  हिरालाल शेंडे माजी सरपंच, चक्रधर पारधी, गौरव नागपूरकर, शंकर पारधी,  नेताजी सुंदरकर, रामजी धोटे,  दीपक प्रधान, प्रा. परशुरामकर, सतीश खरकाटे, ज्ञानेश्वर कावासे,  शालिकराम नाकतोडे, मोहन बगमारे, प्रमोद झिलपे यांच्यासह बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos