महत्वाच्या बातम्या

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे जागतिक सायकल दिन साजरा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : दरवर्षी जागतिक सायकल दिन म्हणून ३ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रम २०२३ नुसार ०३ जुन २०१३ हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते. त्याअनुषंगाने यु.बी. शुक्ल, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिस हचिरोली यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व सायकल स्नेही मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे सकाळी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.


सदर कार्यक्रमास आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विरोली बडगेवार, किडा प्रशिक्षक, गडचिरोली व सायकलस्नेही मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी सायकल रॅलीला हिरवी होडी दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. सायकल रॅली जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथून इंदिरा गांधी चौक पुन्हा परत जिल्हा न्यायालय, गडचिरोली अशा मार्गक्रमाने आयोजित करण्यात आली होती. सायकल रॅलीमध्ये जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील कर्मचारी, जिल्हा किडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, सायकल स्नेही मंडळातील पदाधिकारी / सदस्य आणि विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.
सायकल रैली यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे पी. व्ही. संतोषवार, अधिक्षक एन. आर. भलमे, वरीष्ठ लिपीक, सु. का. चुधरी,  जे. एम. भोयर, कनिष्ठ लिपीक, एस. डब्ल्यु वासेकर, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos