निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली द्वारा आयोजित अनूसूचित जाती प्रवर्गाकरीता एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग कसा उभारावा, उद्योग कसा निवडावा, यशस्वी उद्योजकाचे अनुभव कथन , विविध कार्यालय व महामंडळाचे कर्ज विषयक योजना, जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना तसेच , शासनाचे विविध योजना व निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम करीता नाव नोंदणी करण्यात येणार आहे.  तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अधिक माहिती साठी
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली C/0 डोलीकर यांचे घरी नगर परिषद जवळ, धानोरा रोड, येथे संपर्क साधावा , असे आव्हान संदिप जाने , प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos