काळी -पिवळी टॅक्सीचे कालबाह्य झालेल्या परवान्यांचे नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्हातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी वाहन चालक व मालकांनी कालबाह्य झालेले परवाने नुततीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, गडचिरोली यांनी घेतलेला आहे. तेव्हा गडचिरोली जिल्हयातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी वाहन चालक व मालक यांनी त्यांचे कडील काळी-पिवळी टॅक्सीचे कालबाह्य झालेल्या परवान्यांचे नुतनीकरण लवकरात -लवकर करुन घ्यावे .
काळी-पिवळी टॅक्सी वाहन चालक व मालक कालबाह्य झालेले परवाने नुतनीकरण करुन न घेता वाहन चालवतील अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येऊन वाहन जप्त करण्यात येईल , असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , रविंद्र भुयार यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos