राजुरा येथील श्री. शिवाजी महाविद्यालयात 'उच्च शिक्षणासाठी पर्याय' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने बाॅयोडाटा कसा तयार करावा व 'उच्च शिक्षणासाठी पर्याय' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डाॅ. एस.एम. वारकड , प्रमुख मार्गदर्शक म्हणून रीनायसन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, संचालक डाॅ. जी.एफ. सुर्या,    प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा सचिव अविनाश जाधव ,महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. राजेश खेरानी, प्रा. डाॅ. विशाल दुधे, प्रा. संजय शेंडे, प्रा. विठ्ठल आत्राम उपस्थित होते. 
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डाॅ. जी.एफ. सुर्या  यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधुन प्रश्नोत्तरातुन रेझुममध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा हे सांगून  विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष रेझुम बनवून घेतले व मार्गदर्शन केले. तसेच अविनाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना नुसत्या पारंपरिक डीग्री न घेता सोबत स्पर्धा परीक्षेकडे लक्ष देवून अनेक चांगली उच्च पदे मिळवावित असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्यंकटरमण, प्रा. मल्लेश रेड्डी तसेच महाविद्यालयातील प्राद्यापक वृंद शिक्षेतत्तर कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विशाल दुधे, प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश खेरानी, आभार प्रा. विठ्ठल आत्राम यांनी मानले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-12


Related Photos