महत्वाच्या बातम्या

 एमपीएससीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज 


- रविवारी ११ हजारावर उमेदवारांची पूर्व परीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 4 जून रोजी रविवारी होत आहे. नागपूर येथील 32 उपकेंद्रावर सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच या दोन सत्रात 11 हजार 146 उमेदवार परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.


निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी प्रशासन तयारीला लागले असून 32 उपकेंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांसाठी सूचना : 

या परीक्षेला येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच ओळखपत्राची एक छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र अथवा वरील उल्लेखित पाच वैध ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेला प्रवेश नाकारण्यात येईल. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई -आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीतही उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक सुस्पष्ट फोटोसह कलर प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्याशिवाय ई -आधार वैध मानण्यात येईल.


स्मार्टवॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने सिम कार्ड, ब्लूटूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व परवानगी नसलेली पुस्तके, कॅल्क्युलेटर इत्यादी प्रकारची साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणतेही प्रकारचे अनधिकृत साहित्य सोबत आणू नये. फक्त पेन, पेन्सिल प्रवेश प्रमाणपत्र ओळखीच्या पुराव्यासाठी वैध मूळ ओळखपत्र व मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos