बी. टी. एस. ई स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद : सांजमाडी संस्थेचा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
नगर पंचायत अंतर्गत सांजमाडी या सार्वजनिक वाचनालय तथा अभ्यासिका येथे १० फेब्रुवारी रोजी भामरागड टॅलेन्ट सर्च स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आले . स्पर्धेत तालुक्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . 
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय येथील ४५ , धर्मराव जुनिअर कॉलेज १९, लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालय १९ व राजे विश्वेश्वराव कला वाणिज्य महाविद्यालयातील ३४ स्पर्धकांनी स्पर्धा परीक्षा दिली . 
अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका भामरागड येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन त्यांच्या भविष्याचा वाटा उज्वल व्हाव्यात या हेतूने मागील दोन वर्षांपासून मारोती मानकु गोंगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भामरागड टॅलेन्ट सर्च एक्झाम स्पर्धा परीक्षेचे आयोजन सांजमाडी या सामाजिक संस्थेद्वारा होत आहे . 
स्पर्धा परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून किशोर मज्जी ,सचिन ओकसा, परिशनाथ झाडे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुमित मेश्राम, विजय हलदार, विशाखा मंडल यांनी परिश्रम घेतले . 
वनविभाग कार्यालय भामरागड तर्फे परीक्षेकरिता सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तसेच स्पर्धा परीक्षेचे आयोजक रुपलाल गोंगोले यांनी विशेष आभार मानले .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos