टेकमपल्ली येथे जि. प. उपाध्यक्षांच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील नागेपली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकमपल्ली येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांशी चर्चा करून गावातील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन कंकडालवार यांनी दिले.  
 यावेळी नागेपलीच्या ग्रा प.सरपंचा सरोज किशोर दुर्गे,  जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके, ग्रा प सदस्य माधुरी आलाम, ग्रा प सदस्य ललिता मडावी, ग्रा प सदस्य अनिल आलाम, ग्रा प सदस्य श्रीनिवास निकोडे, कोष समिती अध्यक्ष सतिश आत्राम व गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos