महत्वाच्या बातम्या

 वंजारी समाजातर्फे स्व. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना वंजारी समाज व लोकनेते गोपीनाथ मुंडे बचत गटाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने बंजारी माता देवस्थान येथे आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंजारी समाजाचे माजी अध्यक्ष प्रभाकर कापकर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकून दोन मिनिटांचा मौन पाळण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी वंजारी समाजाचे उपाध्यक्ष दिलीप हेमके, वंजारी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक, संजय हेमके, योगेश कापकर, सतीश धात्रक, आनंद हेमके, ओम साळवे, संदीप कापकर, आशिष गोरे, स्वप्नील धात्रक, प्रसाद साळवे, आकाश हेमके, सुरज हेमके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वंजारी समाजाचे सचिव सतीश धात्रक तर आभार आनंद हेमके यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे बचत गटाच्या सदस्यांनी ने सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos