राजे धर्मराव महाविद्यालयात पालक मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक युवा महोत्सवाअंतर्गत  पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून विलास येलमुले, तारक हिरा, मधुकर परचाके, शंकर दास, सुधाकर मडावी,  चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी मधूकर परचाके यांनी, विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचा सन्मान ठेवत ज्ञान ग्रहण करावे, असे भाष्य केले. तारक हिरा यांनी  महाविद्यालयाबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले की, माझी मुलगी तर महाविद्यालयात  येण्यास आतूर असते. एवढी महाविद्यालयाची तिला ओढ आहे. येथे येऊन याची मला प्रचितीही आली. असे सांगतानाच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा असे आवाहनही केले. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डॉ. हेमंत गजाडीवार यांनी केले. प्रा. डॉ. अजय मुरकूटे यांनी संचालन तर आभार प्रा. डॉ. सुनंदा पाल यांनी मानले. पालक मेळाव्यात बहुसंख्य पालक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos