महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : दहावी मध्ये दिलासागग्राम कॉन्व्हेन्ट चा १०० % निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र माध्यामिक आणि उच्च माध्यामिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल दुपारी 1 वाजता ऑनलाईन द्वारे जाहीर करण्यात आले. त्यात शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेन्ट हायस्कूल (स्टेट बोर्ड) चा १००% निकाल लागला आहे. 


शाळेतून प्रथम येण्याचा मान आस्था सुरेश उमरे हिने पटकविले असून तिला ९६.८० % मिळाले. द्वितीय अनिका प्रितम जयकर ९२.४० %, तृतीय हर्षित मनिष चंदे ९१.८० % आले. महिमा सागर टोंगे  ९१.६० %, नभा राजेश गेडाम ९१.४०%, मोरवी महेश सदाला ९१.२०%,गौरव विनायक ठाकरे ९१.२०%, वीरा हरीश ठक्कर ९१.०० %, संस्कार आनंद टोंगे ९१.००%, अंकिता बलविर सिंह ठाकुर ९०.४०%, शीद्रा अफसर खान पठाण  ९०.२०%, साची हिरालाल पडवेकर ९०.००% व अनुष्का विनय नगराळे हिला ८९.६०% मिळाले. 


शाळेतून १४६ विद्यार्थि परीक्षेत बसले होते. त्यात १३ विद्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण मिळाले. आस्था सुरेश उमरे हिने शाळेतून तीन विषयात प्रथम आली आहे. इंग्लिश ९२, मराठी ९६व सोशल सायन्स मध्ये ९८ गुण मिळाले. मोरवी महेश सदाला हिला हिंदी मध्ये ९५ गुण, नभा राजेश गेडाम हिला गणितात ९८ गुण तर सायन्स विषयात संस्कार आनंद टोंगे याला १०० गुण मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी ने अभिनंदन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos