समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या कन्नमवार वार्डातील समस्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालयातील बिएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शहरी समुदायातील कन्नमवार वार्डातील समस्या जाणून घेतल्या. 
विद्यार्थ्यांनी वार्डामध्ये जावून नागरीकांशी थेट संवाद साधला. वार्डवासीयांच्या सामाजिक समस्या जाणून घेतल्या. सर्व्हेक्षणामध्ये माविद्यालयाचे देवराव वलके, काजल कन्नाके, रमशिला बोगा, रिना डोमळे, भुमे
श कठाणे, मोनाली कठाणने, करीष्मा नागदेवते आदींनी सहभाग घेतला होता. सर्व्हेक्षणासाठी प्रा.डाॅ. एस.एच. बाळबुध्दे, नगरसेविका हेमाताई कावळे यांनी मार्गदर्शन केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos