महत्वाच्या बातम्या

 रस्त्याला असलेले गतिरोधक ठरत आहेत अपघाताला कारणीभुत


- ब्रेकर फलक लावणे व उंची कमी करण्याची प्रवासांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मेंढा ते येरगाव हा रस्ता खराब झाल्याने हा रस्ता पून्हा प्रवाश्याना प्रवास करण्यास योग्य व्हावा, म्हणून प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेचे माध्यमातुन हा डांबरीकरण रस्ता नुकताच बनवण्यात आला. सदर रस्ता तयार झाल्याने प्रवाशी जनता आनंद व्यक्त करीत होती, परंतु त्या रस्त्याला संबधीत ठेकेदाराने आठ गतिरोधक बनविले. आणी गतिरोधक अशा ठीकानी बनविले जेथे पूर्णपणे बाजुच्या झाडाची सावली येते आणी समोर ब्रेकर आहे असे कोनतेही सुचक चिन्ह नाही. त्यामुळे प्रवास करतांना प्रवाश्यांना गतिरोधक लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट हे योग्य व रास्त उंचीत बनवायला पाहीजे होते, पंरतु ते अवाढव्य आकाराचे असल्याने समोरून येणारे वाहणावर बसुन असणारी व्यक्ती खाली पडुन अपघात घडत आहेत. टूवीलर गाडी ही पंचींग होत असल्याने गाडीवरील मागचा बसलेला व्यक्ती खाली पडल्याने अपघात होत आहेत. 


रस्ता बनवून झालेल्या हया १५ ते २० दिवसाच्या कालावधीत ७ ते ८ अपघात या रोडवर झाले असुन हा रस्ता प्रवाश्यांना सध्या स्थीतीत त्रासदायक ठरत असुन आर्थिक भुर्दंड सोसावा लागणारा दिसुन येत आहे. कारण अपघातात हात, पाय मोडण्यापासुन तर मुका मार लागत असल्याने जनतेला दवाखाण्याचा आसरा घ्यावा लागत असुन विनाकारण पैश्याचा अपव्यय करावा लागत आहे.


प्रवाशी जनतेच्या मनात हा प्रश्न उपस्थीत होत आहे, की रस्ता तारक आहे, की मारक हे ठरविणे कठीन आहे. तरी या सबधीत रस्त्याने चारगांव, डोंगरगांव, येरगांव येथील जनतेची मोठ्या प्रमाणात जाणे येणे करण्याची वर्दळ असते. सदर रस्ता तालुका सिंदेवाही येथे जाणारा असुन जनतेला सर्व सोयी सुविधा व कामासाठी याच रस्ताने प्रवास करावा लागतो पायदळ, सायकल, मोटार सायकल, ट्रॅक, इत्यादी वाहनांची या रस्त्याने वाहतुक नेहमी सुरु असते. मोठे वाहनही हया अवाढव्य ब्रेकर मुळे पलटी होवून मनुष्य हानी होण्यास कारणीभुत ठरू शकते. त्यामुळे सदर रस्ताला लावलेले हे ब्रेकर वाजवी व योग्य प्रमाणात ठेवावे आणी रस्ता प्रवाश्यांना लाभदायक ठरेल, असा योग्य करावा. अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य श्यामसुंदर चनफने (चारगांव बडगे) यांचे सह सर्व गावातील जनतेनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos