दिल्लीत हॉटेलमध्ये आग , नऊ जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  दिल्लीत करोलबागमधील अर्पित  पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे.
आता या आगाीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २६ गाडया लगेच घटनास्थळी रवाना झाल्या. काही जण या आगीमध्ये भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण २५ जणांची सुटका करण्यात आली. अर्पित पॅलेस पाचमजली हॉटेल आहे. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत.
या आगीतून २५ जणांची सुटका करण्यात आली असून घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उडया मारल्या असे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल.



  Print






News - World | Posted : 2019-02-12






Related Photos