महत्वाच्या बातम्या

 परदेशात शिक्षणासाठी मिळवा शिष्यवृत्ती


- अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींना ८ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित (आदिवासी) जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

त्यानूसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयांतर्गत चिमूर, ब्रम्हपुरी, नागभिड, वरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षणासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयातर्फे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक प्रवेश घेण्यासाठी ८ जून २०१३ पर्यंत अर्ज सादर करावे, तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी निलेय राठोड यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos