जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती सादर करा


-  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दोन आठवड्यात तारीखनिहाय  सादर करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला. प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला  बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 
 ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात  न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष प्रा साईबाबा  याच्या प्रकरणावर सुनावणी  झाली. तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजीस्ट डॉ. गोपिनाथ यांनी साईबाबाची वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला आहे. त्यावरून साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे सिद्ध होते. याशिवाय साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. त्यामुळे साईबाबाला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. तसेच, सरकारने साईबाबाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला.  उच्च न्यायालयात साईबाबातर्फे अ‍ॅड. बरुणकुमार तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-11


Related Photos