पट्ठ्याने पबजी गेमसाठी गरोदर पत्नीसह कुटुंबाला सोडले !


वृत्तसंस्था / मलेशिया :   केवळ पबजी गेमसाठी या व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीसह कुटुंबाला सोडून दिल्याची धक्कादायक घटना मलेशियात उघडकीस आली आहे.  मलेशियात एक व्यक्ती गेल्या महिन्यापासून बेपत्ता झाल्याची बातमी होती. मात्र, आता या बेपत्ता व्यक्तीने त्याच्या कुटुंबाला सोडून दिल्याची  माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला पबजी गेम्सचे व्यसन  जडले होते. त्यामुळे गेम खेळताना कुणाचाही अडथळा नको, यासाठी त्याने चक्क आपल्या पत्नीला सोडून दिले. 
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. वर्ल्ड बझ या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. याबाबत पीडित पत्नीने फेसबुकवरुन आपल्या पबजी वेड्या नवऱ्याचं दु:ख मांडलं आहे. 'मलाय' भाषेत ही पोस्ट लिहिण्यात आली आहे. आपण पतीला गेम खेळताना रागावल्यामुळे त्यांनी घर सोडल्याचं पीडित पत्नीनं म्हटलंय. विशेष म्हणजे पबजी खेळण्याच्या नादात या व्यक्तीने आपले कामही सोडून दिले होते, आणि इतरही बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचं पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 
   Print


News - World | Posted : 2019-02-11


Related Photos