महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

राज्यातून सुमारे ७० ते ८० हजार उमेदवार सीटीईटी परीक्षेची तयारी करीत असून यातील बहुसंख्य उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. राज्यात नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी क्षमता संपल्याने अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी राज्याबाहेर जावे लागणार आहे.

सीटीईटीसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २६ मेपर्यंत होती. राज्यातून या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱया उमेदवारांची संख्या खूपच जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव आदी जिह्यांतील परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी क्षमता संपल्याने उमेदवारांना दिल्ली, गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना परीक्षा देण्यासाठी परराज्यात जाण्याचा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे राज्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता वाढविण्याची मागणी होत आहे.

अर्ज करण्याची मुदत वाढवा -

सीटीईटी परीक्षेसाठी राज्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता वाढविल्यानंतर उमेदवारांना परीक्षा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्या अशी मागणीही होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या अर्जावरील परीक्षा केंद्राच्या निवडीत सुधारणा करू शकतील.

 - परीक्षेचा अर्ज पूर्ण भरून आधी परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना राज्यातील परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना राज्यातील परीक्षा केंद्र मिळाले.

- सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज भरताना उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या क्षमतेबाबत कल्पना देण्यात आली होती.

- उशिराने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी राज्याबाहेर जावे लागणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos