पाथरी येथे भव्य आरोग्य शिबिर, शेकडो रूग्णांनी घेतला लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पाथरी :
सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या पटांगणावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन काल १० फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील २५०० हुन अधिक रूग्णांनी लाभ घेतला.
ग्रामीण भागात अपुरी वैद्यकीय सेवा असल्याने नागरीकांना दुर्धर आजारावर उपचारासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, ब्रम्हपुरी येथे जाउन उपचार करावा लागतो. त्यांची आर्थिक परिस्थिती व लांब अंतरामुळे बाहेर जावून उपचार करणे गरीब रूग्ण टाळतात. ही बाब लक्षात घेवून पोलिस विभागाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. शिबिरात इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद राउत, अस्थिरोग तज्ञ डाॅ. सुधीर रेगुंडवार, डाॅ. अजय दुद्दलवार, डाॅ. किरण देशपांडे, मानसिक रोग तज्ञ डाॅ. प्रविण पंच डाॅ. शांतीकुमार कोतपल्लीवार, डाॅ. मन्सूर चिनी, डाॅ. अशोक भुक्ते, डाॅ. रवी आखरे, डाॅ. ज्योती चिद्दरवार, डाॅ. निलिमा मुकरे, डाॅ. प्राजक्ता अस्वार, डाॅ. शितल बंडावार, डाॅ. मनिषा रेवतकर, डाॅ. मिनाज शरीफ, डाॅ. सिध्दार्थ नरींगे, डाॅ. अंकीता चांदेकर, डाॅ. परी भाटीया, डाॅ. मार्लावार, डाॅ. यादव, डाॅ. मडावी तसेच इतर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांनी आरोग्य तपासणी केली.
मेडीकल केमीस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना मुलचे अध्यक्ष किशोर गोगुलवार, केमीस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना सावलीचे अध्यक्ष गजानन डोंगे यांच्या सहकाऱ्यांनी  उपस्थित राहून सेवा दिली. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-11


Related Photos