महत्वाच्या बातम्या

 जनतेच्या समस्या प्रलंबित न ठेवता प्राधान्य क्रमाने सोडवा : माजी मंत्री विजय वडेट्टीवार


- सिंदेवाहीत आढावा बैठक : वीज वितरण व सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सर्व सामान्य जनता ही आपली किरकोळ कामे घेऊन शासकीय कार्यालयात येतात. मात्र अधिकाऱ्यांचा अडेलतट्टू पणा व टोलवाटोलवी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार पायपीट करावी लागते. अधिकाऱ्यांच्या अशा गैरवर्तनाबाबत तक्रार आल्यास घरी केल्या जाणार नाही अशी स्पष्ट तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. ते सिंदेवाही येथील विश्रामगृहात आयोजित वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.


आगामी पावसाळ्या हंगामापूर्वी शेती व्यवसाय व रस्ते वाहतुकी संदर्भात नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने विज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सिंदेवाही येथील विश्रामगृहात माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार यांनी आढावा बैठक घेण्यात घेतली. आयोजित बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता जय ठाकरे, सा.बा. उपविभाग अभियंता शटगोपनवार, सां. बा. विद्युत विभागाचे कटकमवार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए. डब्ल्यू .कोलते ,उपअभियंता गायधने, शाखा अभियंता सहारे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव हरि बारेकर, सिंदेवाही ता. काँग्रेस उपाध्यक्ष संजय गहाने, माजी प. स. सभापती वीरेंद्र जयस्वाल,  नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, भूपेश लाखे, नगरसेवक पंकज नन्नेवार, श्याम छत्रवाणी, युनूस शेख, अभिजीत मुप्पिडवार, सचिन नाडमवार, ग्रा.प.सदस्य सचिन सहारे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.


यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या विज वितरण कंपनी कडे असलेल्या समस्यांची दखल घेत माजी मंत्री वडेट्टीवार यांनी विज वितरण कंपनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. तसेच येणाऱ्या पावसाळी व शेती हंगामात शेतकऱ्यांना विज पुरवठा बाबत अडचण निर्माण होऊ नये, याकरिता विशेष उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सिंदेवाही तालुक्यात प्रलंबित असलेले रस्ते, पूल पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेणे तसेच पुर परिस्थिती मध्ये गावांचा संपर्क तुटू नये, याकरिता विशेष लक्ष देऊन नियोजन करण्याचे निर्देश यावेळी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यांनतर नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 





  Print






News - Chandrapur




Related Photos