महत्वाच्या बातम्या

 आरमोरी येथिल गरजू लोकांचा डॉक्टर बनतोय शुभम पसारकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी येथे राबविण्यात येणाऱ्या शोध मोहीम द्वारा अनेक लोकांची कटिंग, दाडी, व मेकओवर करण्यात आला.  
तसेच ज्यांच्या कडे कपडे नाही अश्या लोकांना कपडे देण्यात आले. आणि यामधे शुभमच चांगल काम बघून आरमोरी मधील काही लोक सुद्धा त्यांना त्यांच्या कामासाठी सहकार्य करत आहे. तसेच आरमोरी पोलीस स्टेशन सुद्धा शुभमचे काम पाहून खूप उत्कृष्टरित्या सहकार्य आढळून आला.
आणि आतापर्यंत अशा १५,००० हून अधिक अधिक ग़रजू लोकाना आधार देण्यात आला. ज्यांना घरी पाठवणे शक्य नसते त्यांना ते सेवाभावी संस्थेत पाठवून त्यांच्या उपचाराची व्यवस्था करून देतात.
रस्तावरील फिरणाऱ्या मनोरुग्णांना जेवू घाल, त्यांना कपडे देणे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या मदतीने त्यांचा ठावठिकाण शोधण्याचे काम देखील ते करतात. तसेच या शोध मोहीम मध्ये जे काही कार्य करण्यात आले, त्यात दिव्य वंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर, रवींद्र चौखे (सहायक फौजदार पोलिस स्टेशन आरमोरी), वैद्यराज हरिदास चापले, ज्ञानेश्वर नैताम, ( समाजसेवक), संजय बुटके, सुषमा गलगले, लावण्या येकुचेवार, नीलिमा धोडरे, कांचन निकोडे, दीक्षा अल्लूरी, प्रियंका पेटकर, सुप्रिया कंकलवार यांचा सहभाग होता .





  Print






News - Gadchiroli




Related Photos