केंद्रातील सरकार अपयशी आहे असे म्हणणे असेल, तर महाभेसळीची गरज काय : पंतप्रधान


वृत्तसंस्था / थिरुपूर  :  जर केंद्रातील सरकार अपयशी आहे असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर विरोधकांच्या महाभेसळीची गरज काय आहे असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूतील थिरुपूर येथे ते एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधले. या सभेला व्यासपीठावर मोदींसोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामीही उपस्थित होते. 
रविवारी तामिळनाडूतील काही विकासकामांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर थिरूपूर जवळील पेरुमनाल्लुर येथे एका सभेला त्यांनी संबोधित केले. या भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाजाने स्थलांतर केलं आहे. यावेळी तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि डीएमकेवर मोदींनी निशाणा साधला. ' विरोधत मोदी सरकार अयशस्वी असल्याचे आरोप करतात. पण मला हे कळत नाही की जर मोदी सरकार अयशस्वी असेल तर सर्व विरोधकांना एकत्रितपणे निवडणूक का लढावी लागते आहे? ही महामिलवट स्वत:च्या फायद्यासाठी काही श्रीमंतांनी तयार केलेली युती आहे.' मोदींनी तृणमुल,डीएमके आणि काँग्रेसवर टीका केली आहे.    Print


News - World | Posted : 2019-02-11


Related Photos