महत्वाच्या बातम्या

 मुख्य कार्यकारी अधिकारी तर्फे १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : यावर्षी जाहिर झालेल्या १२ वी स्टेट बोर्ड व सीबीएसई बोर्ड च्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला.

नुकताच जाहिर झालेल्या १२ वी स्टेट बोर्ड च्या परीक्षेच्या निकालात बालाजी स्टडी सर्कल व एनएसपीसी चा मनीष देशमुख याने ९४% गुण प्राप्त करुण जिल्ह्यात पहिला आला. तसेच १२ वी सीबीएसई च्या परिक्षेत ९३% गुण मिळवून जयंत आनंदपवार जिल्ह्यात दूसरा आला व जी-मेन्स परिक्षेत ९७% गुण प्राप्त केले. शिवाय जयंत चा नीट च्या परिक्षेत, key नुसार ६२० गुण अपेक्षित आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः आयआयटी खड़कपुर इथून अभियंत्रिकी शिक्षण घेतले आहेत. त्यांनी आयआयटी बद्द्ल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यश प्राप्त करण्याचे मंत्र दिले.

गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपसल्याने शर्मा व किटे यांचे कौतुक कुमार आशीर्वाद यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व बालाजी स्टडी सर्कल व एनएसपीसी चे शर्मा, किटे यांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos