मोबाईलचा अचानक स्फोट : ८ वर्षीय मुलाने हाताची पाचही बोटे गमावली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नांदेड :
ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट होऊन आठ वर्षांच्या मुलाने हाताची पाचही बोटे गमावल्याची घटना मुखेड तालुक्यातील जिरगा येथे घडली. 
श्रीपाद जेमला जाधव या शेतकऱ्याने दीड हजार रुपयांचा मोबाइल ऑनलाइन पद्धतीने मागविला. त्यांचा मुलगा प्रशांत हा या मोबाइलवर गेम खेळत बसला होता. या वेळी अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. यामुळे त्याने डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे गमावली. तसेच मोबाइलचे तुकडे छातीला, पोटाला लागून दुखापत झाली.  
   Print


News - Rajy | Posted : 2019-02-11


Related Photos