ट्रक व जीपच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जखमी


-  फुलंब्री-खुलताबाद मार्गावरील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
ट्रक व जीपच्या धडकेत दोन जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री घडली. बाबासाहेब आसाराम बोडखे (४०), वैजीनाथ निवृत्ती पेहेरकर (३२, रा. गणोरी), अशी मृतांची नावे आहेत. राहुल बंडू गायकवाड (२७, रा. गणोरी) हा जखमी असून, त्याच्यावर औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणोरी येथील हे तिघे तरुण शनिवारी रात्री जीपने (क्र. एम.एच.०५ -बीएच -५५५६) वानेगाव येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न आटोपून परतत असताना किनगाव फाट्यानजीक समोरून येणाऱ्या हायवा ट्रकशी (क्र. एम.एच.२० -इजी-९७५९) जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात जीपचा चुराडा झाला व तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बाबासाहेब बोडखे याला तपासून मृत घोषित केले, तर काही वेळाने वैजीनाथ पेहेरकर याचाही मृत्यू झाला. जखमी राहुल गायकवाडवर उपचार सुरू आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-11


Related Photos