महत्वाच्या बातम्या

 नागरी सेवा परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षा-२०२३ चंद्रपूर मुख्यालयातील १० उपकेंद्रावर ४ जुन २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कलम १४४ नुसार परीक्षा उपकेंद्र व लगतचा १०० मीटर परिसर सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधीत केला आहे.  

परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी व्यतिरिक्त २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. नियमित वाहतूक व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील तसेच परीक्षेदरम्यान १०० मीटर क्षेत्रांतर्गत झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहील आदेश: विद्या विहार हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम चंद्रपूर,भवानजीभाई चव्हाण हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, सेंट मायकेल इंग्लीश स्कूल नगिनाबाग, सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड, बि.जे.एम. कॉरमेल अकॅडमी तुकूम, रफी अहमद इंग्लिश हायस्कुल नगिनाबाग,  मातोश्री विद्यालय तुकुम, श्री. साई तंत्रनिकेतन कॉलेज नागपूर रोड चंद्रपुर, न्यु इंग्लीश हायस्कुल, चांदा पब्लीक स्कुल, चंद्रपूर या उपकेंद्राला आदेश लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos